इंग्लंडमध्ये गेल्यावर इंडिया हाऊस' मध्ये सावरकरांचं भाषण झालं. इंडिया हाऊस मध्ये भारतातून, उच्च शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी रहात, त्यांना मोठ्या तळमळीनं सावरकर म्हणाले..
रे हिंदवासियांनो । राष्ट्रार्थ नित्य जागा
राहूनियाच सिद्ध, करण्या असीम त्यागा!ध्रु.
जरि वज्र कोसळे हो
धृतिही अभंग राहो
होवो कितीहि हानी शब्दास नित्य जागा!१
शस्त्रास्त्र ज्ञान मिळवा
ती क्षात्रवृत्ती भिनवा
जाणूनि क्रांति सूत्र शिस्तीत सर्व वागा!२
भवितव्यता बलिष्ठा
कर्मी असोच निष्ठा
कतृत्व दाखवूनी सोडाच सर्व संगा!३
एकात्म राष्ट्र होवो
जगि श्रेष्ठताच मिळवो
लाभो प्रसाद हाच, देवास हेच मागा!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
काव्यमय सावरकर दर्शन
No comments:
Post a Comment